जळगाव : राज्यात विविध अधिकाऱ्यांच्या बदली तसेच पदोन्नतीची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आली. यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा समावेश झाला आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या पदोन्नतीचे आदेश काढले. डॉ. महेश्वर रेड्डी यांना जळगावमध्येच पदस्थापना देण्यात आली आहे.
मागील वर्षी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणारे डॉ. रेड्डी हे आता राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील एक प्रमुख नाव ठरले आहेत. यामध्ये अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पुणे शस्त्र निरीक्षण शाखेचे पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांचाही समावेश आहे.
पदोन्नती झालेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये नांदेड नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबई उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा आर. आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंडचे प्राचार्य एन. टी. ठाकूर यांचा समावेश आहे.