---Advertisement---

घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण ; महिना उलटला तरी यादीची प्रतीक्षा

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. परंतु, अद्यापही लाभार्थ्यांची नावे विविध योजनेच्या घरकुलात समाविष्ट होऊन याद्या जाहिर झालेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलाच्या यादीत आपले नावाबाबत खात्री होत नाही, तोपर्यत सर्वेक्षणात नोंद झालेल्या नागरिकांच्या शंकाचे निरसन होणार नाही.

बेघरासह गरजूंना घरे मिळावीत यासाठी शासनाने पंतप्रधान घरकुल आवास योजना, ओबीसी आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना आदी योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. शासनाने यासंदर्भात सर्वे करून या योजनेंतर्गत गरजवंताना घरे देण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पावले उचलली आहेत.

---Advertisement---

घरकुल ही शासनाची महत्कांक्षी योजना आहे. त्यासाठी शासनस्तरावरून जून महिन्याच्या ग्रामीण भागात बहुतांश घरे पडकी ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सर्वे पूर्ण होऊन याद्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. मात्र या याद्या जाहिर झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे समाधान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नव्याने सर्वेक्षण झालेल्या लाभार्थ्यांना यादीत नावाचा समावेश करण्यासाठी अजून किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मध्यापर्यंत सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अंतिम यादीत लाभार्थीकडून नावाची शोधाशोध सुरू आहे. मात्र पंचायत समितीकडून यासंदर्भात अपडेट माहिती अद्यापही उपलब्ध करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीत सर्वेक्षण मोहिमेला वेग देण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---