परवाना विभागातील लिपिकाचे निलंबन करा : आरपीआय आठवले गटाची मागणी

---Advertisement---

जळगाव : स्कुल बसेसचा (एमएच २० डब्ल्यु९९४७ व एमएच २० डब्ल्यु९९५४) परवाना रद्द करण्यासाठी व्यवसाय कराची बनावट पावती सादर केल्याचे सिद्ध झाले होते. तरिही परवाना विभागातील वरिष्ठ लिपीक चंद्रशेखर इंगळे यांनी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याकामी विलंब केला. त्यामुळे त्यांचे निलंबन करत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांना देण्यात आले.


यापूर्वी वाहन क्रमांक (एमएच १८ बीए ०२२१) च्या व्यवसाय कराची पावती बनावट वापरल्याप्रकरणी इंगळे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अनधिकृत एजंट व वाहन मालकाविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. तर (एमएच २० डब्ल्यु९९४७) व (एमएच २० डब्ल्यु९९५४ ) या वाहनांचा परवाना रद्द करण्यासाठीही बनावट कर पावत्या वापरल्याचे सिद्ध झाले आहे. ही वाहने चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मालकिची आहेत. त्यांच्यावरही गुन्हा नोंदविणे हे इंगळेंचे कर्तव्य आहे.

मात्र, त्यांनी गुन्हा न नोंदवता या कामाकाजाशी संबंध नसलेल्या कर्मचाऱ्यास गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी सोपवली. स्वतः अलिप्तता बाळगत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सर्वांविरूद्ध गुन्हा दाखल करत हे प्रकरण दडपण्यापासून वाचवावे अशी विनंती केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---