तळोदा : तालुक्यात भंवर शिवारात तब्ब्ल सात बिबट्याना आतापर्यंत वन विभागाने जेरबंद केले आहे. परिसरात २१ ऑगस्ट २०२४ ते १ नोव्हेंबर २०२४ दरम्यान तळोदे तालुक्यात ७ बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून परिसरात बिबट्यांचा वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीयुक्त वातावरणात रब्बी हंगामातील आपली शेती कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार, १ रोजी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की माजी उपनगराध्यक्ष अनिल पुंडलीक माळी(माळी समाज पंच अध्यक्ष) यांच्या भंवर गावाजवळी मळयात बिबटयाचा मुक्तसंचार करीत असून मळ्यातील दोन कुत्रे फक्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण होते. ही घटना वनविभागाला कळविण्यात आली. वन विभागाने सुरण लावलेल्या शेताचा बांधावर तळोदा वनविभागाने तीन -चार दिवसापुर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला. त्या पिंजरात एक बोकड ठेवला होता. शुक्रवार, १ रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान बोकडची शिकार करण्यासाठी बिबट्या पिंज-यात आत शिराला.
याच वेळी पिंज-याची झडप पडली व पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. ही घटना लक्षात येताच अनिल माळी हे पिंजरा ज्या ठीकाणी लावण्यात आला आहे त्याठीकाणी गेले असता पिजऱ्यात बिबटया जेरबंद झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी पिंजऱ्या झडपाला कुलूप लावून तात्काळ वन विभागाला द्यटना कळवली. वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळावर दारवल झाले व घटना स्थळावरून पिंजरा हलवून त्याला मेवासी वनविभाग कार्यालयात जेरबंद बिबटयाच्या पिंजरा सुराक्षित ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस काढणी चालू असून परीसरात बिबट्याच्या मुक्त सचार सुरू असल्याने शेतकरी,शेतमजुर जीव मुठी धरून आपले कामे करीत आहेत.