---Advertisement---

Tejas Murder Case : रिंगणगाव ग्रामस्थांच्या मोर्चानंतर एसआयटीची स्थापना

---Advertisement---

Tejas Murder Case जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा सोमवारी १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करीत गावकऱ्यांनी तेजसच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (२७ जून ) रोजी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर या हत्याकांडाच्या तपासाकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, रिंगणगावचे गजानन नामदेव महाजन (वय 45) यांचा मुलगा तेजस हा 16 जून रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह काही दिवसांत सापडला असून, गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली असून, पुढे तपासात नरबळीच्या कलमांचा समावेशही करण्यात आला आहे. मात्र, यानंतरही ग्रामस्थांनी तपासाबाबत असंतोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा. तपास करतांना नरबळीचे कलम समाविष्ट करून कार्यवाही करावी. शेतातील सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या एरंडोल संशयित आरोपी करावे. उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करावी. या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. यातील तीन मागण्या आधीच मान्य झाल्या आहेत. दोन मागण्या प्रलंबित असून याकरिता ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

---Advertisement---


पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक केली आहे. या पथकात काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकामध्ये अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव (पर्यवेक्षण अधिकारी) कविता नेरकर , उपविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर. पोलिस उपनिरीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, जितेंद्र वल्टे, , निलेश गायकवाड, राहुल कोळी, सचिन पाटील यांचा समावेश आहे. हे विशेष पथकाकडून तपास अधिक गतीने आणि प्रभावीपणे करण्यात येणार आहे. डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---