---Advertisement---
जळगाव : ‘हर घर योद्धा अभियान’ अंतर्गत श्री अष्टभुजा माता मंदिर, पिंप्राळा येथे 27 मार्च ते 5 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण 77 युवतींनी सहभाग घेत स्वसंरक्षणाचे धडे घेतले.
शिबिरामध्ये लाठीकाठी, निशस्त्र युद्ध, नानचाकू तसेच विविध सेल्फ डिफेन्स तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय हिंदू धर्माची महानता, संस्कार आणि समाजात वावरताना सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. स्वसंरक्षण प्रशिक्षक कु. धनश्री दहिवदकर यांनी प्रशिक्षण दिले.
5 एप्रिल रोजी शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी नगरसेवक नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या कु. सायली पाटील, निखिल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मंदिर देवस्थानचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
वैशिष्ट्ये
शिबिराच्या समारोपावेळी युवतींनी नानचाकू व लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व सहभागी युवतींना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात स्वतः सजग राहण्याची आणि इतरांनाही संरक्षण देण्याची शपथ युवतींनी घेतली.









