---Advertisement---
मुंबई : महाराष्ट्र शासनच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक पदोन्नतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शिक्षक, मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख पदांवर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असणे अनिवार्य राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात 19 जानेवारी 2026 रोजी शासनाने शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवर पदोन्नतीसाठी TET आवश्यक.
न्यायालयाच्या निर्णयानुसार TET ही अट शिथिल करता येणार नाही.
ज्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण केलेली नाही, त्यांना पदोन्नती देता येणार नाही.
TET उत्तीर्ण असून इतर आवश्यक पात्रता पूर्ण करणारे शिक्षकच पदोन्नतीस पात्र ठरणार.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर परिणाम होणार असून, पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे अत्यावश्यक ठरणार आहे. शिक्षण विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनाच्या या भूमिकेमुळे पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









