---Advertisement---

विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली शेंदुर्णी नगरी, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

शेंदुर्णी तालुका जामनेर : खानदेशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये 281 वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी एकादशी उत्सवात श्री त्रिविक्रम महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी आतापर्यंतच्या गर्दीचा उच्चांक मोडून काढत दर्शन घेतले.

प्रारंभी रात्री बारा वाजता श्री त्रिविक्रम महाराजांची महापूजा व अभिषेक शेंदुर्णी नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था चेअरमन अमृत खलसे व लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, तापी पाटबंधारे उप अभियंता जळगावचे प्रवीण गुजर, पाचोरा पीपल्स बँक चेअरमन एडवोकेटअतुल संगवी , संचालक पवन अग्रवाल, युवराज सूर्यवंशी , युवा कार्यकर्ते शिवराज गरुड, अभियंता अक्षय आंबटकर, राजर्षी आंबटकर (बडनेरा ), व्यापारी पवन अग्रवाल आदींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

---Advertisement---


पूजेचे पौराहीत्य श्री त्रिविक्रम मंदिर संस्थांचे विश्वस्त व पुजारी भूषण भोपे , शिरीष भोपे , डॉ. निलेश राव, ज्ञानेश जोशी, विजय पाठक, अरुण जोशी ,जयवंत पिसे यांनी केले. त्यानंतर लगेच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

दुपारी दोन वाजेपासून वरुण राजाने जोरदार हजेरी लावूनही दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह वाढविला. वारी दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरापासून तर थेट सोयगाव रोड वरील पाण्याच्या टाकीजवळ व दुसरीकडे मेनगाव रोडापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यातच शेंदुर्णी ह परिसरातील दिंड्या पालखी मोठ्या संख्येने दाखल होऊन विठ्ठल नामाच्या गजराने सर्वत्र भक्तीमय वातावरणाने अवघी शेंदुर्णी नगरी दुमदुमली होती.

शेंदुर्णी नगरीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थांनी पाणी, चहा, दूध, केळी, केळी वेफर्स, राजगिरा लाडू, साबुदाणा खिचडी चे वाटप केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मोफत पादत्राणे सांभाळणे व पार्किंगचे चोख व्यवस्था पार पाडली , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सेवा भारती देवगिरी प्रांत भुसावळ, शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र, आप्पासाहेब गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा अंतर्गत आरोग्य सेवा तर्फे आरोग्य सुविधा पुरविली.

श्री त्रिविक्रम मंदिरात दर्शनासाठी राजकीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वरिष्ठ अधिकारी यांनीही हजेरी लावून श्री त्रिविक्रम महाराजाचे दर्शन घेतले. दुपारी जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनीही दर्शन घेतले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी पोलीस दुरुक्षेत्राचे नंदकुमार शिंमरे व पहूर व शेंदुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह ज्यादा बंदोबस्तसाठी आलेल्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल, दुर्गा वहिनी राष्ट्रीय स्वयंसेवा योजना त्यांच्या स्वयंसेवकांनी बंदोबस्तासाठी सहकार्य केले. शेंदुर्णी नगरपंचायत विविध संस्था, मंडळे अधिकारी वर्ग पदाधिकारी व कार्यकर्ते , स्वयंसेवक भाविक भक्त व त्रिविक्रम मंदिर संस्थान ग्रामस्थ यांनीही परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---