कापूस हंगाम संपला, भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना

---Advertisement---

 

मालपूर : शेतकऱ्यांच्या घरादारातुन कापुस गेल्यावर, घरे रिकामी झाली का? दरवर्षी कासचा बाजार बहरतो. हे दोन वर्षांपासुन शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकरी अनुभवत आहेत. या भाव वाढीचा काय फायदा. या भाववाढीचा आनंद शेतकऱ्यां ऐवजी व्यापाऱ्यांना दिसुन येत असुन नुकसान शेवटी शेतकरी वर्गाचे ठरलेलेच आहे. हे यावर्षी देखील स्पष्ट झाले आहे.

सध्या बाजारात कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार २०० ते ५०० रुपयांच्या पुढे गेलेले आहेत. हंगामाच्या शेवटी झालेल्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यां ऐवजी साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच झालेला आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कापुस होता तेव्हा खाजगी बाजारात ६ हजार आठशे ते ७ हजाराच्या आसपास प्रतिक्विंटल दर होता. दुसरीकडे सरकारच्या खरेदी केंद्रावर जाचक अटी, कागदपत्रांच्या घोळ आणि स्लाट बुकिंग होत नसल्याम ळे अनेक शेतकऱ्यांनी तेथुन पाठ फिरवली. घरगुती गरजा आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी मालपूर सह परिसरातील ९०% शेतकऱ्यांनी आपला कापुस फेब्रुवारी अखेर पर्यंत विकुन टाकला. येथील कुठल्याच शेतकऱ्यांकडे कापुस पडल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे बाजारपेठेत आता कापसाच्या दरात कितीही तेजी आली तर ती शेतकऱ्यांसाठी काय कामाची. नवीन खरीप हंगामासाठी शेती तयार करण्याचे काम सुरु झाले तोपर्यंत शेतकरी कसा कापुस साठवुन ठेवणार. यामुळे शेतकऱ्यांची घरे रिकामी झाली आहेत.

होळी धुलीवंदन पर्यंत यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाची भाववाढ होईल या आशेवर कापुस घरातच साठवुन ठेवला मात्र भाववाढ झाली नाही. अखेर नवीन वर्षाच्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांच्या हातात भाग भांडवल नसल्यामुळे हा कापुस यानंतर विक्रीला काढला.

शेतकऱ्यांच्या घरादारातुन कापुस गेल्यानंतर लगेच भाववाढ झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी असुन हे सरकार शेतकरी हिताचे नसुन व्यापारांचे भले करणारे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन उमटतांना दिसुन येत आहेत.

यावर्षी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील शेतकऱ्यांनी होळी पर्यंत कापुस साठवुन ठेवला होता. उन्हाचे दिवस सुरु होताच कापसाच्या वजनात घट वाढेल या भितीने कापुस कवडीमोल किमतीने साडे सहा हजार ते सहा हजार आठशे रुपयां पर्यंत विकला. शेतकऱ्यांच्या घरादारातुन कापुस गेल्यानंतर लगेच यात क्विंटल मागे सहाशे ते आठशे रुपयांची वाढ झाल्याने एवढा दिवस कापुस साठवुन ठेवला तरी भाववाढ झाली नाही. मात्र आमच्या घरातुन निघताच भाववाढ होत असेल तर याला शेतकऱ्यांचे शासन कसे म्हणावे यामुळे प्रचंड नाराजी मालपूर सह परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---