संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात प्रमुख नागरिक संघोष्टी; चार शहरांत मान्यवरांची उपस्थिती

---Advertisement---

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि अमळनेर या चार शहरांमध्ये या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात,

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

1.भुसावळ येथे जळगाव रोड वरील प्रभाकर हॉल येथे दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 04.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

2.जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे बहुउद्देशीय सभागृह 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजेच्या दरम्यान कार्यक्रमाच आयोजन करण्यात आला आहे.

3.चाळीसगाव शहरातील पाटीदार भवन भडगाव रोड येथे 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेच्या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे.

4.अमळनेर शहरातील कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह प्रताप कॉलेज परिसर येथे दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5:00 वाजेला कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे.

या संघोष्टींमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कृषी, सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय, पर्यावरण, उद्योग, व्यापार तसेच प्रिंट मीडिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, रिक्षा युनियन आणि विविध घटकांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमासाठी संघाकडून प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल हे जळगाव व भुसावळ येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

तसेच अमळनेर येथे सुनील आंबेकर (अखिल भारतीय प्रचार प्रमुख) हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून कार्य केले आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या संघोष्टींमुळे विविध क्षेत्रातील नागरिकांना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून समाजातील विविध विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---