---Advertisement---
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात संपूर्ण राज्य सध्या शोककळेत आहे. आणि अजित पवार यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शरद पवार गटाचे जेष्ठ नेते तथा आमदार राजेश टोपे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत उमोठा खुलासा केला आहे. अजित दादा जिवंत असतानाच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला होता असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “विलीनीकरणाचा निर्णय झालाच होता.”
अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जवळीक वाढताना दिसत आहे यावर राजेश टोपे यांनी भाष्य केलं आणि म्हणाले “अजित दादांच्या उपस्थितीतच विलीनीकरणाचा निर्णय जवळपास निश्चित झाला होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अगदी शेवटच्या बैठका पार पडल्या होत्या. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती जी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर केली जाणार होती” राजेश टोपे यांच्या विधानामुळे पडद्यामागे अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत ठरलं होतं अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
…तर उपमुख्यमंत्री पद सुनिता पवारांकडे देण्याची मागणी…
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात अजित पवार गटाचे भविष्य काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी व अजित पवार समर्थकांनी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळावी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्या व उपमुख्यमंत्री पद द्या अशी इच्छा व्यक्त केली.
अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने कुटुंबाला सावरलं. त्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढल्याच पाहायला मिळत आहे., तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व करू शकतात अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.









