---Advertisement---
महापालिका निवडणूकी संदर्भात ब्राह्मण समाजास गृहीत धरणाऱ्या व प्रतिनिधित्व बाबत दखल न घेणाऱ्या, अवमान करणाऱ्या पक्षांचा निषेध करून सामाजिक परिवर्तनाची लाट निर्माण करण्याचा संकल्प सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने जळगाव शहराच्या महापालिका निवडणूक संदर्भात एका विशेष अश्या चिंतन व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन विविध संस्था प्रमुख, पदाधिकारी, समाजातील मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या बैठकीला मोठा प्रतिसाद लाभला व यात एकाच पक्षाची कास न धरता जो राजकीय पक्ष ब्राह्मण समाज हिताला प्राधान्य देवून समाजमनाचा आदर राखेल, समाज बांधवांच्या सामाजिक विकास होण्या दृष्टीने आग्रह धरेल त्याच पक्षाच्या प्रवाहात सहभागी होण्यास समाज सकारात्मक असेल अशी भूमिका सर्वानुमते निवड करण्याचे निश्चित करण्यात आले.
तोच संदर्भ विचारात घेवून यंदाच्या महापालिका निवडणूक मतदान आपल्या प्रक्रियेत प्रभागातील योग्य त्याच उमेदवारांना मतदान करावे असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक प्रभागात दोन प्रतिनीधींची निवड
तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या दोन प्रतिनिधींची निवड प्रत्येक प्रभागात केली जाणार असून ते संपूर्ण मतदान प्रक्रिया व उमेदवाराचे ब्राह्मण हित जपण्या दृष्टीने सहकार्य निश्चिती यावर लक्ष देणार आहेत व त्यांचा अहवाल सकल ब्राह्मण समाज निवडणूक समिती प्रमुखांना अध्यक्षांना देणार आहेत.
या संदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी एका विशेष महापालिका निवडणूक मार्गदर्शन बैठकीचे आयोजन १५ जानेवारी अगोदर केले जाणार आहे.
राजकीय साक्षरता वाढविण्यावर भर
पुढील काळातील वाटचालीसाठी ब्राह्मण समाजात राजकीय साक्षरता व जागरूकता वाढीस जाण्यासाठी त्यासंबंधित कायद्यांचे ज्ञान वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील हे देखील निश्चित करण्यात आले. त्यासाठी समाजाच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम देखील राबवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीला सकल ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रातील संस्थानी एका छताखाली एका विचाराने एकत्र येत सहभाग घेवून समाजहित जपणारी ही चिंतन बैठक यशस्वी केली.









