395 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंतच, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‌‘दै. तरूण भारत‌’तर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांचा सूर…!

---Advertisement---

 

युनोस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. किल्ले म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आठवते. आज 395 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत, ज्यांचे विचार जिवंत असल्याचा सूर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‌‘दै. तरूण भारत‌’तर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त ‌‘दै. तरूण भारत‌’ तर्फे बुधवारी (18 फेब्रुवारी) केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या सुरूवातीला ‌‘दै. तरूण भारत‌’चे संपादक चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून शिवजयंतीचा उत्साह आणि बदलते स्वरूप या विषयावर भूमिका मांडली. त्यानंतर सर्जना मीडिया प्रा. लि. चे सहप्रकल्पप्रमुख संजय नारखेडे यांच्या उपस्थितीत चर्चासत्राला सुरूवात झाली. सुत्रसंचालन मनोज भांडारकर यांनी केले.

भावी पिढीला शिवरायांचा इतिहास माहिती व्हावा – भारती साठे

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जयंती साजरी करतांना डीजेपेक्षा परिसंवाद, शाहीरी, चर्चासत्रे, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा अशा विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीला माहिती झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होईल असे मत इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे यांनी व्यक्त केले.

स्त्री सन्मान छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा गुण – संग्राम जोशी

शाहीर संग्राम जोशी यांनी छत्रपती शिवरायांवरील पोवाडा सादर करून रोमांच उभे केले. महाराजांची मुर्ती डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेतले तर खऱ्या अर्थाने तो त्यांना मानाचा मुजरा राहील. स्त्री सन्मान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा गुण आपण अंगीकारला पाहिजे. परस्त्री ही मातेसमान मानल्यास समाजात नवा आदर्श निर्माण होईल असे मत संग्राम जोशी यांनी व्यक्त केले.

---Advertisement---

 

महाराजांचे कार्य उपक्रमांतून पोहचावे – विनोद ढगे

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना उत्सवापुरती मर्यादित न ठेवता विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आताच्या आणि भावी पिढीपर्यंत पोहोचावे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. हा उत्साह तसूभरही कमी झाला नाही असे आपल्या राजाचे कर्तृत्व असल्याचे मत राज्य शाहीर परिषदेचे कार्यवाह विनोद ढगे यांनी व्यक्त केले.

महाराजांनी दिली स्वाभिमानाची शिकवण – संदीप जोशी

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मुर्तिमंत विद्यापीठ. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. तहाच्यावेळी महाराज डगमगले नाही. त्यांनी आपल्या स्वाभिमानाच्या बळावर पुन्हा स्वराज्याची निर्मिती केली. असा स्वाभिमान बाळगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आज आपल्या भावीपिढीसमोर असल्याचे मत शाहीर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज दुरदृष्टी असलेले युगपुरूष – दीपक सुर्यवंशी

छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण सर्वांनीच लहानपणापासून वाचले आहे. रोज महाराजांविषयी नवीन माहिती आपल्याला मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन मोठे कमालिचे होते. गड किल्ल्यांवर हत्ती नेण्याच्या त्यांच्या प्रसंगातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. मोबाईलच्या युगात भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती असावी अशी अपेक्षा नगरसेवक दीपक सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांचे संस्कार रूजवावे – दीपक परदेशी

395 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्वाचा जागर केला जातो ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. जीवनात इतिहास नसेल तर त्या जीवनाला अर्थ नसतो. त्यामुळे इव्हेंट करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे अफाट कर्तृत्व आपल्या मुलांना माहिती व्हावे, त्यांचे संस्कार मुलांमध्ये रूजवावे अशी अपेक्षा भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असावा – प्रा. राजेंद्र देशमुख

ज्या विश्ववंदनीय राजानं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधलं याच कोवळ्या वयात ऑनलाइन गेमिंगच्या नादामुळे एखाद्या पोरगं आपला लाखमोलाचा जीव गमावतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करत असतानाच त्यांचे विचार पालक, मुले, सर्वांनीच खऱ्या अर्थाने डोक्यात घेण्याची गरज असल्याचे मत साहित्यीक प्रा. राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---