जळगाव : येथील चित्रा चौक परिसरातील “जिल्हा कषी आद्योगिक सर्वेसर्वो सहकारी संस्था मर्यादित” कापड दुकानाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरीची घटना २ जानेवारी रोजी घडली होती. यात अज्ञात चोराने ८ हजार रुपये चोरुन नेले होते. याबाबत कमलाकर अभिमान ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच ६ जानेवारी रोजी पोलनपेठ भागातही तीन दुकानांमध्ये चोरी झाली. यात नरेश डुंगरशी सोनी यांच्या पापूलर ट्रेडर्स तेल दुकान, योगेश रामप्रसाद अग्रवाल यांच्या योगेश प्रोव्हीजन किराणा दुकान आणि मिलीद अंबादास अटवाल यांच्या तिरूपती हेअर आर्ट दुकान यांचा समावेश आहे. यात तिन्ही दुकानांचे कुलूप तोडून एकूण ३ हजार ६०० रुपये चोरीला गेले यावर देखील जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही चोरीच्या घटना उघडकीस येताच या गुन्ह्याच्या तपासाकरिता पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी आदेश दिले होते. तपासासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील, आणि हरीलाल पाटील यांच्या टीमने कार्यवाही सुरू केली. तपासादरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वंसत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव) याचा शोध घेण्यात आला. त्याला अंजिठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याने दोन्ही चोरींची कबुली दिली.
तपासात आरोपीकडून १८ हजार ९८० रुपये जप्त करण्यात आले. आरोपीवर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कार्यवाहीचे मार्गदर्शन पोलिस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.