---Advertisement---
भुसावळ : भुसावळ विधानसभेचे आमदार व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना व त्यांच्या परिवाराला ॲसिड टाकून देईल अशी धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी वरणगाव व भुसावळ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी भूषण भास्कर पाटील याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
---Advertisement---
मंगळवारी (८ जुलै) रोजी भूषण पाटील याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला वकील देखील मिळू शकला नाही. त्याच्यावर वरणगाव व अन्य ठिकाणी देखील गुन्हे दाखल असून त्या गुन्हा त्याला वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आरोपी हा साकेगाव येथील रहिवासी आहे. काही दिवस तो डोंबिवली येथे देखील राहत होता. त्याने केवळ ना. सावकारे यांना शिवीगाळ केली नाही तर एका विशिष्ट समाजाला देखील तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील त्यांनी अवमान जनक उल्लेख केला आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी व संजय सावकार यांचे समर्थक यांनी संताप व्यक्त केला आहे. या आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी , अशी मागणी करण्यात आली आहे.