चोपडा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यानुसार एरंडोल तालुक्यातील कासोदाशेजारी २० ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलीस वाहनांची तपासणी करत असतांना एका वाहनातून एक कोटी ४५ लाख रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान, आज पुन्हा अशी तपासणी करत असताना पोलिसांना चोपडा तालुक्यात चारचाकी वाहनात रोकड मिळून आली आहे. चोपडा तालुक्यातून नाका बंदी दरम्यान, तीस लाख रुपयांची रोकड रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. गुरुवार, २४ रोजी मध्यरात्री तिरंगा चौक श्रीनाथ प्राईड येथे होंडाई व्हेन्यू कंपनीच्या चारचाकी वाहनात तीस लाखांची रोखड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाकाबंदीत घटनेतील चारचाकी होंडाई व्हेन्यू कंपनीची क्रमांक MP 09 -CK 7474 असा असून हिच्यामध्ये ३० लाखांची रुपये रोकड पोलिसांना मिळून आली. त्यात ५०० रुपये दराचे १५ लाख रुपये, तर २०० रुपये दराचे ६ लाख रुपये, आणि १०० रुपये दराचे ९ लाख रुपये अशी रोकड मिळून आली आहे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी इम्रान अल्लाउददीन मन्सुरी (वय ४४ रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश) व अजय अरुण पाटील (वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपड़ा ) हे दोघे वरील रोकड रक्कम घेऊन चोपडामार्गे जळगावकडे जात असताना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड हॉटेल समोर मिळून आले आहेत. याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे.
कारवाई अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर (पवार) तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे, योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, शिपी, ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनिकांत भास्कर, अक्षय सुर्यवंशी, समा तडवी यांनी केली