---Advertisement---

अरेरे ! शस्त्र खरेदीसाठी आले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात, तिघांना अटक

---Advertisement---

इंदोर : महाराष्ट्रातील तिघा तरुणांना मध्यप्रदेशातली बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हे तिघा तरुणांनी युट्युबवर मध्यप्रदेशातील उमरठी गावात शास्त्रांची विक्री केली जात असल्याचा व्हिडिओ पहिला होता. यामुळे ते शस्त्र खरेदीसाठी उमरठी गावात आले होते. परंतु, पोलिसांनी त्यांना अटक करीत पुढील तपास हाती घेतला आहे. वन्य प्राण्यांपासून शेताचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी आपण आलो होतो असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले.

---Advertisement---

बडवानी पोलिसांना काही लोक शस्त्रे खरेदी करण्यासाठी येणार असल्याची गुप्ता माहिती मिळाली होती. याबाबत वरला पोलीस ठाण्याचे प्रभारी सौरभ बाथम यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणले की, वरला-बलवाडी रस्त्यावर एका हॉटेलसमोर एक कार जात असतांना पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील लोक पळून जाऊ लागले. पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी एका झाडावर जाऊन आदळली.

यानंतर पोलिसांनी गाडीत बसलेल्या तिन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. यात युसूफ चौगुले, गणेश गायकवाड आणि राहुल आडाव या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांकडून कारसह चार देशी बनावटीच्या बंदुका, दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी माहितीनुसार, नगरमध्ये युसूफविरोधात दोन गुन्हे तर गणेश गायकवाड याच्या विरोधात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ६ गुन्हे दाखल आहेत. देशी बनावटीच्या पिस्तूल आणि बंदुका बनवण्यासाठी बडवनी जिल्ह्यातील उमरठी गाव कुप्रसिद्ध आहे. येथील शस्त्रांना देशभरातून मागणी आहे. दरम्यान, पोलिसांनी अधीक चौकशी केली असता या तरुणांनी सांगितले की, त्यांच्या शेतात डुक्कर येऊन पिकांची नासधूस करून नुकसान करतात. तसेच या डुक्कर यांनी अनेकांना जखमी केले आहे. या त्रासापासून वाचण्यासाठी आंपण येथे शस्त्र खरेदीसाठी आलो असल्याची कबुली दिली. बडवानी जिल्ह्यातील उमरठी येथे शस्त्रे बनविले जातात याची माहिती यूट्यूबवरून मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---