नदीत बुडून बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

---Advertisement---

 

घुग्घूस : धानोरा गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या राजू कोडापे, अर्पिता राजू कोडापे या वडील आणि मुलीसह त्यांची भाची प्रियांका मडावी या तिघांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजुरा तालुक्यातील खामोना येथील राजू कोडापे यांची बहीण धानोरा येथे राहत असल्याने ते आपल्या मुलीसह बहीणीकडे धानोरा येथे आले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास चंद्रपूर-गडचांदूर मार्गावरील धानोरा गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर राजू कोडापे, मुलगी अर्पिता, भाची प्रियांका मडावी तसेच रोहन मडावी व सलोनी मडावी यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेले होते. राजू कोडापे, मुलगी अर्पिता व भाची प्रियांका हे तिघे जण अंघोळ करण्यासाठी नदीत गेले असता यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत असलेले रोहन व सलोनी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना अपयश आले.

घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. चंद्रपूर येथून बचाव पथकालाही पाचारण
करण्यात आले. बोटीने शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु, त्यांचा मृतदेह आढळला नाही. या घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---