मराठा प्रीमियर लीगचा थरारक शेवट; पंडित हॉस्पिटल संघ विजेता

---Advertisement---

 

मराठा प्रीमियर लीगचा अंतिम सामना शांताई लॉन विरुद्ध पंडित हॉस्पिटल या दोन बलाढ्य संघांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेक्षकांच्या जल्लोषात रंगलेल्या या सामन्यात पंडित हॉस्पिटल संघाने दमदार कामगिरी करत सात विकेट्सने शानदार विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शांताई लॉन संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न केला; मात्र पंडित हॉस्पिटलच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करत लक्ष्य सहज पार केले. संघाच्या गोलंदाजांनीही अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच अंतिम सामन्यावेळी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांमध्ये राहुल पवार, विजू मराठे, प्रफुल पाटील, शेखर देशमुख, हर्षल पाटील, विशाल पाटील, प्रीतम पाटील, बबलू अहिराव, राकेश गावंडे, सुभाष जाधव, आर. के. पाटील, नितीन पाटील, हर्षल देवकर, रितेश निकम, राहुल परकाळे, सचिन देशमुख, राहुल अकोलकर, नितीन बोरसे, विनोद पाटील, किरण कदम, सुनील घोलप, अक्षय पाटील, अभिषेक पाटील, विवेक बोदरे, भरत कर्डिले, चेतन पाटील, चेतन पवार, ज्ञानेश्वर पाटील, तनिष्क कदम, तुषार पाटील, अजय देशमुख, अरविंद पाटील, निखील पाटील, सागर पाटील, राहुल पाटील आदी मॅनेजमेंट कमिटीतील सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंनीही क्रीडास्पर्धेतून एकात्मता आणि संघभावनेचा उत्कृष्ट संदेश दिला. मराठा प्रीमियर लीगमुळे स्थानिक पातळीवर क्रिकेटला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---