जळगाव । सोने आणि चांदीच्या दरात चढ-उताराचे सत्र कायम असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले, मात्र दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.जर तुम्ही आज सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारातील नवे दर तपासून घ्या…
सोन्याचा भाव
या आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढून ७७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे (विनाजीएसटी).
चांदीचा भाव
दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, १,००० रुपयांनी कमी होऊन चांदीचा दर ९१,००० रुपये प्रति किलोवर आला आहे (विनाजीएसटी).
भाववाढीमागील कारणे
आंतरराष्ट्रीय घडामोडी: जळगाव शुद्ध सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मोठा परिणाम होतो.
युद्धसदृश्य परिस्थिती: दोन देशांमधील तणावपूर्ण स्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत आहे.
अमेरिकन फेडरल बँकेची बैठक
आज १७ आणि उद्या १८ डिसेंबर रोजी अमेरिकन फेडरल बँकेची बैठक होणार आहे.
यावेळी ०.२५ टक्के व्याजदर कपातीचा अंदाज आहे.
आगामी अंदाज
तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन दिवसांत सोन्याच्या दरात १५०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.