जळगाव-भुसावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मुंबईसाठी उद्या 2 ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे लोकार्पण होणार….!

---Advertisement---

 

जळगावसह भुसावळमधील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांना जळगावसह भुसावळ येथे थांबा देण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, वाराणसी ते पुणे (हडपसर) आणि अयोध्या कॅन्ट ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहेत. यामुळे उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांशी जळगाव-भुसावळचा थेट संपर्क होणार आहे.

यात वाराणसी-हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी 02531 या क्रमांकाने 28 एप्रिल रोजी वाराणसी येथून दुपारी ४:४५ 4.45 मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता भुसावळ जंक्शन येथे आणि 3.35 वाजता जळगाव येथे तर रात्री 12.55 मिनिटांनी पुणे (हडपसर) येथे पोहोचणार आहे. या गाडीला अफवा डाऊन मार्गावरील प्रयागराज, झाशी, बिना, राणी कमलापती, इटारसी, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला असून या गाडीत 22 डबे असणार आहेत यात (8 स्लीपर, 11 जनरल, 2 एसएलआर, 1 पॅन्ट्री कार) असणार आहे.

यासह अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी 02212 या क्रमांकाने 28 एप्रिल रोजी अयोध्या कॅन्ट येथून सायंकाळी 4.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.35 वाजता भुसावळ येथे तर
1.15 वाजता जळगाव येथे आणि रात्री 9.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला अप-डाऊन मार्गावरील सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे या प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आला असून या गाडीला एकूण 22 डबे असणार आहेत यात (8 स्लीपर, 11 जनरल, 2 एसएलआर, 1पॅन्ट्री कार) राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---