---Advertisement---

उद्या संत नामदेव महाराजांच्या 675 वा संजीवन समाधी पालखी सोहळा

---Advertisement---


जळगाव : श्री क्षत्रिय अहिर शिंदे समाज येथे वर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच सहयोगी संस्था यांच्या विद्यमाने मंगळवारी (22 जुलै ) रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या आनंदमय व उत्सवात साजरा करण्यात येणार आहे.

सर्वप्रथम सकाळी साडेआठ वाजता शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृह येथील संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व पूजन मान्यवरांच्या हस्ते होईल. यानंतर पालखी सोहळ्याला भव्य टाळा मृदुंग गजरात सुरुवात होईल पंधरा पाच चौक, मारुती पेठ, रामपेठ, सराफ बाजार, सुभाष चौक, पुष्प लता बेंडाळे चौक मार्गाने गुरुद्वारा येथे येईल. यावेळी शेख बांधवांतर्फे पालखीचे स्वागत करून पुढे दुपारी बारा वाजता पालखी सरदार वल्लभभाई पटेल भवन बीएसएनएल ऑफिसच्या मागे समारोप होईल. या ठिकाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.

---Advertisement---

गेल्या एक महिन्यापासून संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, सहसचिव दीपक जगताप, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, वस्तीग्रह प्रमुख दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, महिला अध्यक्ष रेखा निकम, सदस्य गणेश सोनवणे, सुरेश सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील प्रत्येक विभागात जाऊन समाज बांधवांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देत आहे. तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---