---Advertisement---
जळगाव : व. वा. वाचनालयाच्या नवीन बाल व युवा विभागाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (१ जुलै ) सुप्रसिद्ध विद्यार्थी व पालक मार्गदर्शक, शिक्षण तज्ञ राजीव तांबे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरचा विभाग हा मुंबई येथील आर. जी. मानुधने फाउंडेशन फॉर एक्सलन्स या ट्रस्टच्या भरघोस देणगीतून उभारण्यात आला आहे.
व. वा. वाचनालयात लहान मुले व युवकांसाठी स्वतंत्र व प्रशस्त विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके व वाचण्याची गोडी वाढावी यासाठी विविध कल्पना राबविण्यात आल्या आहेत. मुलांनी नियमित भेट द्यावी यासाठी ही विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिवाय इंटरनेटच्या वापरातूनही मराठी, हिंदी, इंग्रजी वाङ्मयाची आवड लागावी असे प्रयत्न आहेत.
---Advertisement---
विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून अनेक शाळांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येतील. आज सुद्धा विद्यार्थ्यांशी पुस्तक गप्पा हा कार्यक्रम राजीव तांबे यांच्याबरोबर घेण्यात येणार आहे.
बुधवारी (२ जुलै ) पालकांशी गप्पा व मार्गदर्शन असा जाहीर कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता व. वा. वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावरील नव्या विभागात आयोजित केलेला आहे. या संपूर्ण उपक्रमास उद्योजक संदीप काबरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या दोन्ही कार्यक्रमास जास्तीत जास्त मुलांनी व पालकांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.