---Advertisement---
तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेत भंडाराच्या मयुरी उर्फ माई हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आला आहे मात्र अद्याप एक तरुण बेपत्ता आहे जे पाटील असं बेपत्ताच नाव असून तो जळगावच्या जामनेर तालुक्यातील पारधी येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे संबंधित गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील हे तिन्ही मुलं चेन्नई येथील एका मोठ्या आयटी कंपनीत इंटर्नशिप करत होते शनिवारी सुट्टीच्या दिवशी जवळपास 26 जणांचा ग्रुप चेन्नई येथील बीचवर फिरायला गेला होता दुर्दैवाने याच वेळी समुद्र खळवळला आणि महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेल्याचं समजत आहे.
मयुरी चौधरी असंमृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे ती मूळची भंडारा येथील रहिवासी आहे तर पाळधी तालुका जामनेर येथील रहिवासी असलेल्या जय पाटील नावाचा युवक अद्याप पेपर आहे एकाला वाचवण्यात बचाव दलाला यश आला आहे. परराज्यात महाराष्ट्रातील तरुणांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.









