---Advertisement---
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस देवकर आप्पा गटाला शिरसोलीत मोठा धक्का बसला आहे. जळगाव विधानसभा क्षेत्राचे प्रमुख श्याम कोगटा, शिरसोलीचे सरपंच नितीन बुंदे, माजी सरपंच प्रवीण बारी, आणि सामाजिक कार्यकर्ते शिवदास बारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकत्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांनी नामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आणि कार्यावर विश्वास व्यक्त केला. यानंतर त्यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला.
---Advertisement---
यामुळे शिरसोली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शुभम बारी, देवेंद्र बुंदे, शुभम खलसे, भगवान भाऊ हटकर, हेमंत बुंदे, नितीन आस्वार, नितीन बारी, शिवा आडबाल, गौरव बुंदे, गणेश बुंदे, शुभम सावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये या पक्षप्रवेशाचा शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.