---Advertisement---

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा भावांचा जागीच मृत्यू

---Advertisement---

जळगाव : शहरात जुन्या महामार्गावर आज बुधवारी (४ जून) पहाटेच्या सुमारास एक अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे असे मयत झालेल्या भावांची नावे आहेत.

जुन्या महार्गावर असलेल्या कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने ज्ञानेश्वर शिवदे व प्रमोद शिवदे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना (शिंदे गट) महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते, तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ज्ञानेश्वर आणि प्रमोद शिवदे हे दोघेही बंधू पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकत्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अपघातानंतर अशात काहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिवसेना शिंदे गटातीत कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment