---Advertisement---

हरणाची तस्करी करणारे दोघे जाळ्यात, बोरअंजटी – वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी

---Advertisement---

हरणाची (काळवीट) या वन्य प्राण्याची शिकार करुन त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर शुक्रवारी (१७ जुलै) चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८. रा. टाक्यापाणी, ता.वरला.म.प्र.) तसेच धुरसिंग वलका बारेला (वय ४५, रा. बरुड, म.प्र.) अशी संशयितांची नावे आहेत.

(एमपी १० एनसी ४८५७) या दुचाकीवरुन बांगऱ्या बारेला आणि त्याचा साथीदार असे दोघे वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येत आहेत, अशी गोपनीय माहिती वाहतूक केसेस करणारे हवालदार राकेश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांना मिळाली. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर छापाकामी सूचना दिल्या.

वन्यप्राण्याच्या तस्करी संदर्भात ही खबर असत्याने ही माहिती फॉरेस्ट अधिकाऱ्यांना पोलिसांनी दिली. त्यानंतर फॉरेस्ट कम्पार्टमेट २३६ बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर पोलिसांचे पथक रवाना होऊन नाकाबंदीला सुरुवात केली. सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास दोन इसम (एमपी १० एनसी ४८५७) दुचाकीने चोपडाकडुन वैजापूरकडे जाताना पथकाला नजरेस पडले.

दोघांच्या मध्ये गाडीवर गोणीत साहित्य ठेवल्याचे हेरताच पथकाने दोघांना थांबविले. गोणीमधील साहित्याची खात्री केली असता त्यामध्ये काळवीटाची (हरीण) दोन शिंगे, प्लॅस्टिक बॅगमध्ये काळविटाचे मांस मिळून आले. वन्यजिव संरक्षण अधिनयम १९७२ मधील शेड्युल १ मधील प्रतिबंधीत हरणाची शिकार केल्याने दोघा संशयितांवर वनविभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे.

या पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भाग अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सफौ राजु महाजन, हवालदार राकेश पाटील, पो.कॉ. गजानन पाटील, पो.कॉ. विनोद पवार, पो.कॉ. चेतन महाजन, पो.कॉ. सुनील कोळी तसेच वनविभागाचे आरएफओ विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी.आर.बारेला, वनरक्षक बानु बारेला, वनरक्षक योगेश सोनवणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---