---Advertisement---
रोम : इटलीच्या बर्मागो प्रांतातील कोवो येथे बैसाखी उत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गुरुद्वारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या एका गोदामातून बाहेर पडत असतानाच दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
हा हल्ला शुक्रवारी मध्यरात्रीच्या काही मिनिटे आधी शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील गुरुद्वारा माता साहिब कौर जी समोरील चौकात
घडला. मृतांची ओळख पटली असून, रागिंदरसिंग आणि गुरमितसिंग अशी त्यांची नावे आहेत.
हल्लेखोराने जवळ जाऊन गोळीबार केला आणि नंतर वाहनातून फरार झाला, असे वृत्तांत म्हटले आहे. अचानक झालेल्या मारहाणीचे रूपांतर रक्तपातात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. ही अतिशय थंडपणे केलेली पूर्वनियोजित हत्येची शक्यता असून, पोलिस अधिकारी त्या दिशेने तपास करीत आहेत.









