‘मेरा युवा भारत’अंतर्गत ना.रक्षा खडसेंनी साधला युवक-युवतींशी संवाद

जळगाव, दि.१५ – केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्या वतीने ‘मेरा युवा भारत’अंतर्गत १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मुंबईतील २७ युवक-युवतींसाठी आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री खा.रक्षा खडसे यांनी युवकांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी युवकांनी केसीआयआयएल (KCIIL) आणि केबीसी एनएमयू (KBC NMU) या ठिकाणी भेट देऊन विद्यापीठातील युवकांशी संवाद साधला. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी युवकांना कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि नियोजित उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी युवकांना समाज आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्यावरील जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले.

हेही वाचा : गाडीचा कट लागल्याच्या वादातून रिक्षाचालकाकडून माजी आमदाराचा खून, घटनेमुळे सर्वत्र खळबळ

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि “खेलो इंडिया” कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच, नंदू जाधव यांनी महाराष्ट्रातील बालविवाहासंबंधी मुद्द्यांवर संवाद साधला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी युवकांशी संवाद साधून जळगावच्या इतिहास, संत मुक्ताई, आदिवासी भाग, अर्थव्यवस्था आणि शेतीविषयी माहिती दिली. त्यांनी “माय भारत” (MY Bharat) पोर्टलविषयी माहिती देत युवकांना या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल  काटा

पंतप्रधानांच्या विकसित भारत आणि ‘विरासत से विकास’ या दृष्टिकोनावर चर्चा करताना त्यांनी, युवकांना सामाजिक विकासात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. तसेच “खेलो इंडिया”, भारताच्या २०३६ ऑलिंपिक स्पर्धेसाठीच्या तयारीसंबंधी आणि “किर्ती” उपक्रमाबाबतही माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान, युवकांनी विविध सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे देत मंत्री महोदयांनी त्यांना अधिक जाणून घेण्याची प्रेरणा दिली.

येत्या काही दिवसांत हे युवक लालमाती आश्रम शाळा आणि अजिंठा लेणींची भेट देतील. याशिवाय विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.