---Advertisement---

विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात

---Advertisement---

---Advertisement---

एरंडोल : येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी अभ्यासक्रमात सन 2025 – 26 पासून समाविष्ट करण्यात आली आहे.


विलास मोरे यांची ” पांढरे हत्ती काळे दात ” ही संपूर्ण कादंबरी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एमए ( कला शाखा) अभ्यासक्रमात होती. तसेच त्यांची “धोंड्या” ही कथा प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अभ्यासाला आहे. त्यांच्या “शाळेला सुट्टी लागली रे ” या बाल कविता संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या ” पांढरे हत्ती काळे दात ” या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार तसेच याच कादंबरीला जामनेर मसाप शाखेचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार अजरा , ठाणे , जळगाव , रेंदाळ – कोल्हापूर या सह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

दिलीजराज प्रकाशन पुणे या प्रकाशन संस्थेने त्यांची १० पुस्तकं प्रकाशित केलेली असून रत्री वेदनेची करुण कहाणी विदित करणारी ” मुक्या विहीरीची आवाज ” ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. “तिसरा डोळा ” या कांदबरीचे इंग्रजी भाषांतर प्रा. सुरेश पांडे आणि “शाळेला सुट्टी लागली रे “: बाल कविता संग्रहाचे इंग्रजी भाषांतर डॉ. एस. आर. पाटील यानी केलेले असून ते या पूर्वी प्रकाशित झालेले आहेत.

पिलास मोरे यांची कथा, कविता, कादंबरी, बाल कथा, बालनाट्य, बाल कादंबरी असे एकुण १६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आधारवर चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका असून “झाला वारा मंद ” व ” सेल्फी फोटू .” हे दोन व्हिडिओ अल्बम प्रसिद्ध आहेत.
एमए ते इयत्ता पहिली अशा या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या प्रवास असून त्यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील मराठी भाषा विभाग प्रमुख, साहित्यिक डॉ. म .सू. पगारे, डॉ. एस. आर. पाटील , स्टार प्लस वरील ऐतिहासिक मालिका लेखक प्रताप गंगावणे, संगीतकार अमर देसाई, डॉ . माधव कदम, डॉ. जितेद्र गिरासे, डॉ. वासुदेव वले, प्रा. सुरेश पांडे, ॲड. मोहन बी . शुकला, वि. दा. पिंगळे, अशोक सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. जी. आर. महाजन, प्रा. देवबा पाटील व विविध साहित्यिक संस्था प्रतिनिधी तसेच साहित्यिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यांनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---