जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट; ठिबक सिंचनातून आधुनिक शेतीचा आढावा

---Advertisement---

 

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जळगाव येथील जैन हिल्स ला भेट देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सविस्तर पाहणी केली. जैन इरिगेशन सिस्टिम्स च्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांमधून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन वाढीची क्षमता त्यांनी अनुभवली.


फळे, फुले, भाजीपाला यांसह भात, गहू, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि कडधान्ये या पिकांवर ठिबक सिंचनाचा यशस्वी वापर कसा करता येतो, याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. विशेषतः ठिबकवर भाताचे उत्पादन शक्य नसल्याचा समज चुकीचा ठरवत, या तंत्रामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याचे प्रात्यक्षिकातून स्पष्ट करण्यात आले.


या प्रयोगांबद्दल आश्चर्य व्यक्त करत, भात उत्पादक राज्यांमध्ये ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे संकेत ना. चौहान यांनी दिले.
भेटीदरम्यान हळद, आले, संत्रा, डाळिंब, आंबा यांसारख्या पिकांसाठी टिश्यू कल्चरद्वारे तयार करण्यात येणाऱ्या रोगमुक्त रोपांचीही त्यांनी पाहणी केली. तसेच ग्रीनहाऊस, पॉलिहाऊस आणि शेडनेटसारख्या नियंत्रित वातावरणातील शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर क्लायमेट स्मार्ट शेती, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग यांसारख्या आधुनिक पद्धतींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ‘सिक्स इन वन’ तंत्रज्ञानासारख्या नवकल्पनांमुळे उत्पादन वाढीस चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे , खासदार स्मिता वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक सिंचन, जलव्यवस्थापन आणि विज्ञानाधारित शेतीचा अवलंब केल्यास भारत शेती क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन प्रगत राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवू शकतो, असा विश्वास ना. चौहान यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---