Voting Awareness : जळगावात रांगोळीद्वारे मतदान जनजागृती

जळगाव : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदानामध्ये सर्व घटकाचे १०० टक्के मतदान व्हावे याकरिता प्रशासन तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटना मतदान जनजागृती मोहीम अंतर्गंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात हस्ताक्षर मोहीम, रांगोळी प्रदर्शन, मतदान शपथ आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येत आहेत.यानुसार अयोध्या नगरमध्ये झेप प्रतिष्ठानतर्फे मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

अयोध्या नगरमध्ये विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी झेप प्रतिष्ठानतर्फे रांगोळी काढून त्यात ,तुमचे मत तुमचा अधिकार, मतदान करा लोकशाही बळकट करा असे आवाहन करणारे संदेश या रांगोळीतुन देण्यात आले व जनजागृती करण्यात आली यासोबतच सर्व महिलांनी मतदान करण्यासाठी मतदान हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आम्ही तो योग्यरित्या पार पाडू अशी शपथ घेतली. याप्रसंगी हर्षदा अविनाश पाटील यांनी मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच मतदान हा आपला अधिकार असून 20 नोव्हेंबरला प्रत्येकानं तो बजवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या जनजागृती मोहिमेत भावना भोळे, मनिषा पाटील, सपना तायडे, जान्हवी सपकाळे, संगीता कोळी, मंगला पाटील, प्राजक्ता माळी, शारदा वंजारी, कल्पना पाटील, आशा चौधरी,अरुणा महाजन, योगिता गंवादे, मनिषा भोसले, सौ धांडे, हिराबाई सोनार आदी महिला सहभागी झाल्या होत्या.