अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक संशय? अजित दादांच्या विमानात स्फोटकं होती ? ‘पुरावे द्या अन्यथा चौकशी करा’ अमोल मिटकरींचा प्रश्न….!

---Advertisement---

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत हा अपघात घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेला १७ दिवस उलटूनही अद्याप सत्य समोर न आल्याने सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, अजित पवारांच्या विमान अपघातामागे निव्वळ तांत्रिक बिघाड नसून काही वेगळे कारण असू शकते. “विमान जळून बेचिराख झाल्यानंतरही त्यात स्फोट झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मग विमानात आधीच काही स्फोटके पेरली होती का, याची तांत्रिक तपासणी होणे अत्यावश्यक आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, अपघातानंतरचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप सार्वजनिक का केले जात नाहीत? ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि वैमानिकांमधील संभाषणाची माहिती १७ दिवस उलटूनही का जाहीर करण्यात आलेली नाही, असा प्रश्नही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. वैमानिक मदन शाही आणि यश यांच्याबाबतची संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री स्तरावर मागणी करूनही ठोस उत्तर न मिळाल्याने, आता अमोल मिटकरी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे मेलद्वारे चौकशीची मागणी करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

“समाजात दोन मतप्रवाह आहेत-एक गट याला अपघात मानतो, तर दुसरा हा घातपात असल्याचे म्हणतो. जर घातपाताचा संशय चुकीचा असेल, तर सरकारने अधिकृत पुरावे सादर करून जनतेचा संभ्रम दूर करावा. अन्यथा निष्पक्ष चौकशी करावी,” अशी स्पष्ट भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात आणि देशपातळीवर मोठी चर्चा सुरू असून, तपास यंत्रणा पुढे कोणता खुलासा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---