आर. आर. पाटील
जळगाव : सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. लोकांनी कष्टातून केलेल्या कमाईवर हे दरोडेखोर सायबर ठग नेहमी लक्ष ठेवून असतात. लूट करण्यासाठी सायबर ठगांची टोळी ऑनलाइन, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर २४ तास सक्रिय असते. जळगाव जिल्हात डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन नजरकैदेचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही फसवणुकीच्या प्रकरणात सायबर ठगांनी लाखो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला. डिजिटल अरेस्टमध्ये १८ लाख लुटले होते. मात्र सायबर पोलिसांनी तपासातून तक्रारदाराचे १७ लाख वाचविण्यात यश प्राप्त केले.
काय आहे डिजिटल अरेस्ट ?
ग्राहकाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉत करून अनोळखी व्यक्ती संपर्क साधण्याचा
प्रयत्न करतात. फोन रिसिव्ह करताच, सायबर ठग म्हणतो. मी पोलीस अधिकारी बोलतोय. मुंबई गुन्हे शाखेत तुमच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, किंवा मी सीबीआय अधिकारी, मी ईडी अधिकारी असल्याचा बनाव हे सायबर ठग करतात, ते अतिशय आत्मविश्वासाने संवाद साधतात. खराखुरा अधिकारीच बोलत असल्याचे पुरेपूर भासवितात. तुमचे आर्थिक गुन्ह्यात नाव आले आहे. हा मोठा घोटाळ्याचा कट असून पात तुम्ही संशयित आहात. यातून कशी सुटका करायची, हे तुम्ही पाहा, मात्र आताच्या क्षणापासून तुम्हाला आम्ही अरेस्ट केली आहे. अटक केली आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणी गोपनीयता ठेवा. कोणाशी संपर्क साधू नका. अन्यथा ती व्यक्ती चौकशीच्या गर्तेत (फैन्यात) येईल, असा दम भरतात. इतकेच काय, हे ठग पोलिसांनाही सांगू नका. अशी तंबी देतात.
असाही बनाव रचला जातोय
तुमच्या नावाचं पार्सल आहे. त्यात ड्रग्स आहेत. ड्रग्स रॅकेटमध्ये तुम्ही सक्रिय असून या पार्सलमुळे आता तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकला आहात. तक्रारदार व्यक्तीने पार्सत पाठवले नाही किंवा मागविले नाही, असे उत्तर दिल्यास सायबर ठग म्हणतो. तुमच्या आधार कार्डाचा क्रमांक, तुमचा मोबाइल क्रमांक त्यावर नमूद आहे. आणि त्याच क्रमांकावरून तुम्ही आमच्याशी बोलत आहात. तुम्ही खोटं कशासाठी बोलत आहात? असा दम भरत बोलती बंद करतात तुम्ही या क्षणाला कायदेशीर दृष्ट्या खूप अडचणीत सापडले आहात. कदाचित तुम्ही त्यात नसालही. मात्र कागदोपत्री तुमचा रोल दिसतो आहे. यातून तुमची सुटका आम्ही करू शकतो. या प्रकाराची वाच्यता कुटुंबातील कोणाजवळही करू नका, पोलिसांनाही कळवू नका. अन्यथा तुम्हाला अटक होईल आणि आम्ही तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. अमुक कतमानुसार इतक्या शिक्षेची तरतूद आहे.
याची जाणीव करून देतात. तुम्ही व्हिडिओ कॉलवर कायम रहावे, संपर्कात असावे, म्हणून ते दबाव आणतात. आम्ही जे सांगू ते तुमच्या भल्याचेच असेल. फोन उचलताच ठग समोरच्याला जाळ्यात ओढतात. अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही मोठा फ्रॉड केला आहे. असा दम भरत प्रकरणात गांभीर्य असत्याचा आव आणत ते संबंधित व्यक्तीस चौकशीच्या फेऱ्यात घेतात. जे अस्तित्वातच नाही, अशी डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाइन नजरकैद असा अफलातून प्रयोग करून सायबर ठग ताखो रुपयांना गंडा घालत आहेत.
आभासी पोलीस ठाणे, न्यायालयात कामकाज
आभासी तंत्रयुगात खरंखुरं वाटावं, असं चित्र दिसते. मात्र वस्तुस्थिती तशी नसते. केवळ आभास असतो. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी असते. पोलीस ठाणे दिसते. ठाणे अंमलदार बसलेला असतो. अधिकारी कॅबिनमध्ये
असतो. तक्रारदाराता हे आभासी जग खरेखुरे वाटते. त्यातील संवाद साधणाऱ्या व्यक्तीवर तक्रारदार बिनधास्त विश्वास ठेवतो. तो जे सांगतो. ते तो ऐकून तशी कृती करतो.
मनी लाँडरिंगमध्ये तुमचे सीमकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर झाला असून तुमच्याविरुद्ध मुंबई क्राईम ब्रेचला गुन्हा दाखल झाला आहे, अशी बेमालूम थाप देतात. ते ऑनलाइन नजरकैदेतही ठेवून सायबर ठग जबरी तूट या माध्यमातून करीत आहेत.
असा करा स्वतःचा बचाव
व्हॉट्सअप मोबाइलवर ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे अनोळखी व्यक्तीचा कॉल आल्यास तो मोबाइलधारकाने उचलू नये. उचलला गेलाच तर सायबर ठग घाबरवित असलेल्या गोष्टींना मुळीच घाबरू नये. ठगांनी कितीही मोठा अधिकारी असल्याचा आव आणला तरी त्याला घाबरू नये. तो सायबर ठगच बोलत आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतामध्ये पोलीस किंवा तपास यंत्रणा व्हॉट्सअपवर किंवा व्हिडिओ ऑडिओ कॉल करत नाहीत. अधिकारी बोलत आहे, असेही सांगत नाहीत. डिजिटल अरेस्ट हा प्रकार व्यवस्थेत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणाला काही कारण नाही.
अनोळखी कॉलला उत्तर देऊ नका
कोणत्याही अनोळखी व्हिडिओ कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये मुळात डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणूक करताना खात्रीपूर्वक करावे. कुरियर, पार्सलच्या नावाने कोणी ओटीपी मागत असेल तर देऊ नये कोणालाही फोनद्वारे स्वतःची व बँकेची वैयक्तिक माहिती सांगू नये. कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर
ऑनलाइन व्यवहार करताना पूर्ण खात्री करूनच करावी.
-डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव.