---Advertisement---

Jalgaon News : मारूतीरायाची मूर्ती स्थलांतरित करतांना अचानक आली वानरसेना अन् पुढे जे घडलं…

by team
---Advertisement---

पहूर : गावात एखादं सार्वजनिक काम करायचं म्हटलं की तिथं गावकऱ्यांची गर्दी झालीच म्हणून समजा. खेड्यापाड्यातील हेच वातावरण आकर्षणाचा विषय ठरतो. जामनेर तालुक्यातील पहूर येथे हिरा मारुतीची मूर्ती तिला स्थलांतरित करत असताना गावकऱ्यांसोबतच चक्क वानरसेनेनेही हजेरी लावली .

जामनेर तालुक्यातील पहुर येथे प्रस्तावित नवीन श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच, तेथील हिरा मारुतीच्या २० फूट उंच मूर्तीचं स्थलांतर होतं असताना अचानकच वानर सेनेचं आगमन झाल्यानं, पहुरमधील नागरिकांनी हा अद्भुत आणि भक्तिमय क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.

मागील अनेक दिवसांपासून या मूर्तीच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, अनेक अडचणींवर मात करून स्थलांतर सुरू असताना वानरांची हनुमान प्रतिप्रती आस्था दिसून आली असंच ही दृश्य पाहून गावकऱ्यांनी म्हटलं. ही हिरा मारुतीची मूर्ती २ एप्रिल २००७ रोजी, गावातील हनुमान भक्त हिरा बारी यांनी स्वतःच्या खर्चाने स्थापित केली होती. अखेर, अनेक प्रयत्नांनंतर ही मूर्ती यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आली. खरंतर गावात देवदेवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार, मूर्तीचं स्थलांतर या गोष्टी नव्या नाहीत. पण, काहीच कल्पना नसताना मात्र अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे प्राणीमात्रांनी हजेरी लावणं, कोणतीही अडचण निर्माण न करता सुरू असणारं काम पाहणं या गोष्टी सर्वांनाच भारावून सोडतात आणि पहूर गावातील नागरिकांनी हाच क्षण इथं अनुभवला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment