---Advertisement---
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरल्याचं चित्र आहे. गुरुवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेनंतर आता एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, नवा उपमुख्यमंत्री कोण?
अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत एकमुखी निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आज मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले असून, या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्याच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, राजकीय वातावरण तापल्याचं स्पष्ट दिसत आहे.
उद्या होणाऱ्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की एखादा धक्कादायक निर्णय समोर येणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.









