या’ प्राण्याच्या फोटोला मिळाला सर्वोत्तम फोटोचा पुरस्कार; बघा ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’

---Advertisement---

 

स्पर्धेतील 24 फोटो
एका खेळकर आयबेरियन लिंक्सच्या (Lynx) फोटोला यावर्षीचा ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2026’ पुरस्कार मिळाला आहे.

लिंक्स हा प्राणी मांजराच्या प्रजातीतील असून तो बिबळ्यापेक्षा लहान आणि रानमांजरापेक्षा मोठा असतो. अमेरिका आणि यूरोपच्या उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आणि आशियाच्या उत्तर व मध्य भागांत हे प्राणी आढळतात.

ऑस्ट्रियाचे फोटोग्राफर जोसेफ स्टेफान यांनी हा फोटो काढला आहे. ‘फ्लाईंग रोडन्ट’ (Flying Rodent) हे या फोटोचं नाव आहे. स्पेनच्या सियुदाद रिअल प्रांतातील ‘Torre de Juan Abad’ येथे 2 आठवडे राहून हा फोटो त्यांनी काढला आहे.

हा फोटो काढण्यासाठी ते अनेक दिवस एका जागी लपून प्रयत्न करत होते. त्या दरम्यान एके दिवशी एक तरुण लिंक्स प्राणी अचानक तिथे त्याची शिकार घेऊन आला आणि त्याने ती शिकार हवेत फेकत झेलण्यास सुरुवात केली.

जोसेफ स्टेफान म्हणाले, “तो लिंक्स सुमारे 20 मिनिटं त्याच्या शिकारीसोबत खेळण्यात मश्गुल होता. कधी कधी तो मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून त्या शिकारीकडे नजर रोखून बघायचा. मला त्या लिंक्सचा खेळ बघून असं वाटलं की आता ‘तो उंदीर (रोडन्ट) आता उडायलाच लागेल.”

काहीवेळाने त्या लिंक्सचा या खेळातला रस संपला आणि तो त्याची शिकार घेऊन झुडपात खायला निघून गेला.

आयबेरियन लिंक्स ही जगातील सर्वात दुर्मिळ वन्य मांजरांपैकी एक प्रजात आहे आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीला, 100 पेक्षाही कमी लिंक्स शिल्लक राहिले होते. त्यामुळे ही प्रजात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती.

दीर्घकालीन संवर्धन आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमुळे, या प्रजातीची संख्या वाढली. आता 2 हजारांहून अधिक आयबेरियन लिंक्स आहेत. तरीही, आययूसीएनच्या (International Union for Conservation of Nature) वर्गीकरणानुसार, हे लिंक्स अजूनही ‘असुरक्षित प्रजाती’ (Vulnerable Species) समजले जातात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---