भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही, शुक्रवारच्या नमाजला मंगळवारच्या हनुमान चालीसाने उत्तर देऊ- डॉ. प्रवीण तोगडिया यांचं विधान…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी उपस्थिती लावत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. मात्र, परिषदेनंतर त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले की, ज्या पद्धतीने राम मंदिर बनवलं त्याच पद्धतीने देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याबाबत प्रयत्न करणार. त्यांनी राम मंदिराच्या उभारणीचा उल्लेख करत त्याच पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले.

याशिवाय त्यांनी काही समुदायांविषयी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुस्लिमांची वाढती लोकसंख्या आणि संसाधनांवरील ताण यावर त्यांनी भाष्य करत काही कठोर शब्दांत भूमिका मांडली. ते म्हणाले की “भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही, आम्हाला आमचं घर सुरक्षित ठेवायचा आहे आपण लोकसंख्या वाढवणार आणि आमचा टॅक्स मधून खाणार” हे चालणार नाही. तसेच “मुस्लिमांच्या शुक्रवारच्या नमाजला आम्ही मंगळवारी हनुमान चालीसा म्हणून उत्तर देऊ” असं विधान त्यांनी केलं आणि त्या वक्तव्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, आपल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रवीण तोगडिया यांनी प्रश्न उपस्थित करत इतिहासातील घटनांचा संदर्भ दिला. त्यांच्या मते, काही विधानांना तेढ निर्माण करणारे विधान ठरवले जाते, मात्र संभाजी महाराजांचे बलिदान झालं तेव्हा दोन समाजात तेढ निर्माण झाला नाही का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ऐतिहासिक घटनांमध्येही समाजात तणाव निर्माण झाला होता, असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---