---Advertisement---
जळगाव : महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन कार्यकारी अधीक्षक यांना मंगळवारी (१५ जुलै ) रोजी देण्यात आले आहे.
विद्युत महावितरण कंपनीकडून जळगाव शहरातील सर्व सामान्य नागरिकाच्या घरात बळजबरीने व सक्तीने पोष्टपेड स्मार्ट मिटर बसविण्यात येत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात या संदर्भातील प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले की, पोष्ट पेड स्मार्ट मिटर बसविण्याची सर्वसामान्य जनतेवर कोणतीही सक्ती नाही. कोणाच्याही संमती विरुध्द बसविण्यात येत असल्यास गुन्हे दाखल करता येतील.
---Advertisement---
परंतु , मक्तेदाराकडील कर्मचारी सर्वसामान्य विज ग्राहकांवर सक्तीने व बळजबरीने स्मार्ट मिटर बसविण्यास भाग पाडत आहे. स्मार्ट मिटर न बसविल्यास जुन्या मिटरची रिडींग घ्यायला आम्ही येणार नाही अशी धमकी देतात. सदर स्मार्ट मिटरबाबत अनेक राज्यात ते बसविण्यास विरोध होत असून मध्यप्रदेश, जबलपूर येथील रहिवाश्यांनी व विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी पुराव्यासह दाखवून दिले की चेक मिटर द्वारे CEIV९८ युनीट वापर झालेला असतांना स्मार्ट मिटर प्रत्यक्ष ५९८ युनीट दाखविण्यात आले आहे. तसेच म्हसवड (महाराष्ट्र) येथील पालिका हद्दीतही बसविण्यात आलेल्या स्मार्ट मिटर द्वारे रिडींग नेहमीपेक्षा पाचपट आले आहे.
५ ते ६ हजार रुपये खर्च करुन बनविण्यात आलेले स्मार्ट मिटर हे १२ ते १५ हजार रुपये शासनाकडून घेऊन बसविण्यात येत आहेत. ही रक्कम सर्व सामान्य जनतेच्या खिश्यातून सुरक्षा अनामत व मीटर भाडे, मीटर शुल्क आदी नावाने उकळण्यात येऊ शकते. तसेच आता पोष्टपेड मीटर सांगण्यात येत असले तरी सदर स्मार्ट मिटर भविष्यात प्रीपेड मीटर मध्ये रुपांतरीत होऊ शकता तशी व्यवस्था त्या स्मार्ट मीटर मध्ये असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
तरी सदर स्मार्ट मीटर जनतेच्या जीवावर उठणारे व अन्यायकारक असल्याने जनतेची आर्थिक पिळवणूक करणारे ठरणार असल्याने स्मार्ट मिटर बसविण्यात येऊ न ये व ते बसविण्याकरिता सक्ती करण्यात येऊ नये. अगोदर बसविण्यात आलेले मीटर ज्यांचे बिल २०० ते ३०० रु. दोन महिन्याचे येत होते त्यानंतर बदलविण्यात आलेल्या मीटरचे बील १२०० ते १३०० रुपये तेही एक महिन्याचे वाढलेले असतांना आता परत स्मार्ट मीटर पाच पट रिडींग जास्त दाखवत असल्याच्या तक्रारी देशभर असल्याने सर्वसामान्य ग्राहकाचे बील पाचपट म्हणजे ४ हजार ते ५ हजार रुपये तेही एक महिन्याचे येणार असल्याने स्मार्ट मीटर बसविण्याचा गोरखधंदा महावितरण कंपनीने थांबवावा, अन्यथ तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजु मोरे, संग्राम सुर्यवंशी, डॉ. रिझवान खाटीक, रिंकु चौधरी, आकाश हिवराळे, चेतन पवार नईम खाटीक, गोटु चौधरी यांच्यामार्फत देण्यात येत आहे.