---Advertisement---

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेला झाले तिळे, शस्त्रक्रिया यशस्वी

---Advertisement---

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विवाहितेने तिळ्या मुलांना जन्म आहे. यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मातेसह मुलांची सुखरूप प्रसूती रुग्णालयात पार पडली. या कामगिरीबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे.

सपना राठोड (वय २५) यांना प्रसूतीसाठी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दाखल झाली होती. यावेळी महिलेच्या पोटात तीन बाळ असल्याचे निदान झाल्यावर वैद्यकीय पथकाने यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. महिलेनं तीन गोंडस मुलांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉ. राहुल कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुरज कोठावदे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. श्रद्धा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ट निवासी डॉ. डॉ. माधुरी उदगिरे, डॉ. चंद्रकांत बर्गे, डॉ.श्रेष्ठा शुक्ला, डॉ. श्रीहरी बिरादार व डॉ. मिताली इंगळे यांच्यासह बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, प्राध्यापक डॉ. अंजू पॉल , वरिष्ठ निवासी डॉ. ऐश्वर्या मोने आणि कनिष्ठ निवासी डॉ. तासीन सीदा यांनी सहकार्य केले.

---Advertisement---

तीन्ही नवजात मुले अनुक्रमे १.६ किलो, १.९ किलो आणि २.० किलो वजनाची असून सर्व मुले ठणठणीत व निरोगी आहेत. सध्या ती नवजात शिशु अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

“महिलेची प्रसूती ही वैद्यकीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील असते. मात्र आमच्या प्रसूतीशास्त्र आणि भूलतज्ञ टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तीळ्यांची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आई आणि सर्व तीन मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत,” अशी माहिती डॉ. राहुल कातकाडे यांनी दिली.

ही प्रसूती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावच्या कुशलतेचा आणि उत्कृष्ट आरोग्यसेवेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. सपना राठोड आणि त्यांचे कुटुंब या आनंददायी घटनेमुळे खूप आनंदित असून, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील, अधिसेविका संगीता शिंदे व रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकही समाधान व्यक्त करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---