जळगाव । मानपहद्दीतील खेडी शिवारात शनिवारी घरात घुसून महिलेला शिवीगाळ करत विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहराजवळील खेडी शिवारातील प्रेम बेकरी परिसरात ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्य करते. हि महिला गुरुवार, १० रोजी आपल्या पतीसह घरी होती. यावेळी रावेर तालुक्यातील खिरोदा येथील संशयित आरोपी रवींद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गजरे या दोघांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी या दोघांनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिलेचा हात पकडत विनयभंग देखील केला. यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला धक्काबुक्की केली.
प्रकाराने भयभीत झालेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेवून तक्रार दिली. महिलेच्या फिर्यादीवरून शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी रविंद्र उर्फ गोलू भागवत चौधरी आणि चेतन प्रदीप गाजरे (रा.खिरोदा ता.रावेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे