विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांची झळाळी; अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कातकरी नृत्य सादर

---Advertisement---

 

जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार कातकरी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विद्यार्थ्यांनी आणि वादकांनी आपल्या जोशपूर्ण सादरीकरणातून जळगावचा झेंडा नाशिकमधील विश्व मराठी संमेलनात दिमाखात फडकावला. बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत व प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नांतून या विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण नृत्य सादर केले. सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण आणि सचिन महाजन यांच्यासह संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---