Crime News : घरात कोणी नव्हतं, तरुणाचा धक्कादायक निर्णय, गावात हळहळ

जळगाव  :  घरात कोणी नसतांना ३६  वर्षीय तरुणाने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. चेतनकुमार एकनाथ महाजन (वय ३६ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोरपवली येथे चेतनकुमार हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. अशातच आज मंगळवारी, घरी कोणी नसतांना चेतनकुमार याने छताला लावलेल्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, चेतनकुमार याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांना लक्षात येताच, त्यांनी लागलीच धाव घेतली. चेतनकुमार याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. चेतनकुमार याने आत्महत्या केल्याची वार्ता कोरपवली गावात पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

याप्रकरणी चेतनेचे वडील एकनाथ दिगंबर महाजन यांच्या माहितीवरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पीआय प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी पुढील तपास करीत आहेत.

चेतनकुमार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. चेतनकुमार हा मनमिळाऊ स्वभावाचा तरुण होता. त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.