Jalgaon News : दुर्दैवी! वडिलांच्या वाढदिवशीच तरुणीची आत्महत्या

जळगाव : शहरातील संभाजीनगर येथे १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. विशाखा गौतम सोनवणे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मू. जे. महाविद्यालयात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने दुपारी तिने त्यासंदर्भातील स्टेटस देखील ठेवले होते.

हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा

कुटुंबाला जबर धक्का

विशाखाच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. मात्र, संध्याकाळी विशाखाने बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. काही वेळाने तिच्या आईने तिला बोलवण्यासाठी दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता विशाखा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा :  मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

पोलिस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. ही घटना संपूर्ण कुटुंबावर आणि मित्रमंडळींवर मोठा आघात करणारी ठरली आहे.