---Advertisement---

प्रेमसंबंधातून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; प्रेयसीच्या वडील-भावावर गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धमाणे येथे घडली. या प्रकरणी प्रेयसीच्या वडिलांसह भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमाणेतील गोपाल शंकर माळी (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचा पुतण्या राधाकृष्ण वामन अहिरे-माळी (२०) याचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याबाबत तरुणीच्या घरी कळाल्यानंतर तिचे वडील व भावाने रामकृष्ण यास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

यामुळे रामकृष्ण याने दि. २६ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास देवभाने शिवारातील गोपाल माळी यांच्या शेतात आत्महत्या केली. त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यावरून तरुणीच्या वडिलांसह तिच्या भावाविरुद्ध सोनगीर पोलिसांत गन्दा दाखल करण्यात आला आहे.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

धुळे : गावठी कट्टा बाळगणाऱ्या पंढरपुरातील दोघांना एलसीबीने बेड्या ठोकल्या. या दोघांकडून १ पिस्टलसह दोन काडतूस हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलीम रियान हुसेन मुलाणी व रितेश संतोष लोहार (दोन्ही रा. उमरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हे दोघे देशी बनावटीचा कट्टा बाळगून असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती, तसेच ते दोघे नगांवबारीच्या पुढे साईकिशन हॉटेलजवळ उभे असल्याचे समजले. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकाला कारवाईसाठी रवाना केले.

पथकाने या दोघा संशयितांची झडती घेतली असता मलिक हुसेन मुलाणी याच्या कमरेला गावठी कट्टा व मोबाइल, तसेच रितेश लोहार याच्या पॅटच्या खिशातून २ काडतूस मिळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम सन १९५९ चे कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment