---Advertisement---
जळगाव : युवासेना-शिवसेनेतर्फे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी महासराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील तब्बल ८१८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला.
ही परीक्षा रविवारी, ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आली. शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना सचिव Varun Sardesai यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि फार्मसी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या (CET) धर्तीवर ही सराव परीक्षा घेण्यात आली.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील महावीर क्लासेसमध्ये आयोजित या परीक्षेस जिल्ह्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळण्यास मदत झाली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, कॉलेज कक्षाचे प्रीतम शिंदे, अजय खैरनार, प्रा. शिवराज पाटील, अक्षय गादिया, प्रा. हर्षल ठाकूर, प्रा. गुंजन चौधरी तसेच चिन्मय नाझरकर यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, अशा शैक्षणिक उपक्रमांची गरज अधोरेखित होत आहे









