जळगाव : शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या अनिल हरी बडगुजर (वय-४६) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली होती. मयत अनिल बडगुजर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सोबत काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचे नाव लिहून सुसाईड नोट घरच्यांना मोबाईलवर पाठवली होती.
अनिल बडगुजर हे जिल्हा परिषदेतील डीआरडीओ विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने ते मॅनेजर म्हणून काम करत होते. रविवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी वाघ नगर येथील राहत्या घरात त्यांने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवून दिली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता.
सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्रास
दरम्यान अनिल यांच्या कुटुंबीयांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अनिल याला गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी अनिलकडे ६ लाखांची मागणी केली. सुरूवातीला ६ लाख रूपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा ६ लाखांची मागणी केली. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. असा आरोप आई लिला बडगुजर आणि कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सगल दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव
सुसाईड नोट मधील नावे
हरेश्र्वर भोई,राजु लोखंडे,कोमल जावळे,सुरेखा पाटील,रुपाली पाटील,सीमा पाटील,साधना देशमुख,शरद पाटील,संदिप खेडकर
मिळालेल्या माहितीनुसार प्रकरणाती तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात आई लिला, वडील हरी बडगुजर, भाऊ अमित आणि दोन बहिणी असा परिवार आहे.