---Advertisement---

१०० दिवस सुधारणा मोहीम ; जिल्ह्यातील आठ कार्यालयांचा राज्यस्तरीय गौरव

by team

---Advertisement---

जळगाव : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कार्यालयांनी कामकाजात पारदर्शकता, नवोपक्रम, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या शासकीय कार्यालयांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आठ शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.

या निवडीत प्रथम क्रमांकासाठी खालील कार्यालयांचा समावेश आहे: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव,सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव,प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, यावल.

---Advertisement---

द्वितीय क्रमांकासाठी: सहाय्यक संचालक, नगररचना, जळगाव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव,

तृतीय क्रमांकासाठी: जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव.

या कार्यालयांनी कामकाजात पारदर्शकता, नवोपक्रम, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यामुळेच त्यांची राज्यस्तरावर निवड झाली असून, जिल्ह्याच्या प्रशासकीय यशात भर पडली आहे.

या यशाबद्दल केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील काळातही कार्यक्षमता आणि सेवा गुणवत्तेत सातत्य ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---