जळगाव : विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या २३१ उमेदवारीपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आजच्या ४ नोव्हेंबर शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघासाठी एकूण १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्य उमेदवारांची संख्या)
चोपडा-९ (७) रावेर-९ (१४), भुसावळ-९ (७) जळगाव शहर-२९ (८) जळगाव ग्रामीण-११ (६) अमळनेर-१२(४), एरंडोल-१३ (०७) ,चाळीसगाव-८ (८) पाचोरा-१२ (१२) जामनेर-१०(१२)मुक्ताईनगर-७ (१७)
सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदार संघात २३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . दरम्यान, मघारीच्या अंतिम दिवशी एकूण ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघ
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापैकी अनिता सुनील सोनवणे, निलेश सुरेश चौधरी, रियाज सादिक देशमुख, प्रतापराव गुलाबराव पाटील, योगेश एकनाथ कोळी, मुकेश मूलचंद कोळी या ६ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
त्यामुळे आता रिंगणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून गुलाबराव देवकर, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे, हिंदुस्थान जनता पार्टीचे किशोर मधुकर झोपे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण जगन सपकाळे, तर अपक्ष म्हणून गुलाबराव रघुनाथ पाटील, प्रसाद लीलाधर तायडे, भगवान दामोदर सोनवणे, भरत देवचंद पाटील, शिवाजी महाराज हटकर आणि सोनी संतोष नेटके अशा ११ जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.