---Advertisement---

जळगाव शहरातील 16 व्यापारी संकुले उद्या राहणार बंद

by team

---Advertisement---

जळगाव : शहरातील महापालिकेच्या मालकिच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या 2 हजार 368 गाळेधारकांचा प्रश्नांवर महापालिकेतील गठीत समिती दोन दिवसात 5 टक्के नुसार रेडिरेकनर दर गाळेधारकांवर आकारण्याचा निर्णय येत्या दोन दिवसात होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा निर्णय गाळेधारकांना मान्य नसून अविकसीत मार्केटमधील गाळेधारक या दरानुसार ऐवढी रक्कम भरू शकणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात महापालिका गाळेधारक संघटना सोमवार दि. 26 रोजी व्यवसाय बंद आंदोलन करणार आहे अशी माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.


गाळ्यांबाबत महापालिकेच्या समितीद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयाच्या विरोधात जळगाव महापालिका मुदत संपलेल्या गाळेधारक संघटनेकडून रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोनवणे बोलतांना पुढे म्हणाले, की जळगाव महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 368 गाळेधारकांची मुदत 2012 पासून मुदत संपली होती. शासनाकडून गाळेधारकांच्या हीत जोपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतू महापालिकेने स्थापन केलेल्या समितीमध्ये गाळेधारक संघटनेचे तज्ञ प्रतिनिधी समावेश न करता एकतर्फी निर्णय घेतला जात आहे.

हे 18 अविकसीत व्यापारी संकुलातील गाळेधारक 5 टक्के रेडिरेकनर नुसार पैसे भरू शकणार नाही. 2 टक्के तसेच 2017-19 पर्यंतचे भाडे दुप्पट घ्यावे अशी मागणी गाळेधारकांची आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी गाळेधाकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिकेसमोर तसेच 18 व्यापारी संकुल हे सकाळी दहा ते दुपारी 2 पर्यंत व्यवसाय बंद करून आंदोलन करणार असल्याची माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

हे मार्केट आज दुपारपर्यंत बंद राहणार
छत्रपती शाहू मार्केट, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी.जे. मार्केट, रामलाल चोबे मार्केट, धर्मशाळा मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, जुने शाहू मार्केट, भास्कर मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्याना जवळील दुकाने, रेल्वे स्टेशन जवळील मार्केट, शाहू दवाखाना येथील दुकाने, गेंदालाल मिल मार्केट, लाठी शाळा जवळील मार्केट, भोईटे हे 16 मार्केट सोमवारी 27 मे रोजी दुपारी 2 पर्यंत बंद राहतील.

यांची होती उपस्थिती
गाळेधारक संघटनेच्या बैठकीस डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, युवराज वाघ, आशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील, तेजस देपुरा, वसीम काझी, पंकज मोमाया, कमलेश तलरेजा, शिरीष थोरात, गिरीश अग्रवाल, राजेश समदाणी, हेमंत परदेशी, सुनील गगडाणी, संजय अमृतकर, विनोद पांडे, अनिल पाटील, ऋषी सोळुंके, संभाजी निंबाळकर, योगेश बारी, केशव नारखेडे, ललित मराठे, अमित भागवाणी आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment